Sahakar Nagar Pune Crime News | बनावट चलनी नोटा बाळगणार्‍याकडून सव्वा पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त (Video)

Sahakar Nagar Police

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | बनावट चलनी नोटा (Fake Notes) बाळगणार्‍या एकाला सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) अटक केली असून त्याच्याकडून सव्वा पाच लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या २५० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. निलेश हिराचंद वीरकर Nilesh Hirachand Virkar (वय ३३, रा. विष्णु गावडे चाळ, चिंचवड स्टेशनसमोर, चिंचवड) असे त्याचे नाव आहे. (Sahakar Nagar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA8uAzBJgSY

सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिग करत होते. सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर ते आले. पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना एक जण गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जात असल्याचा दिसला. त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर पकडले. त्याने आपले नाव निलेश विरकर असे सांगितले. गडबडीत निघून जाण्याचे काय कारण आहे, असे विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सारखा पँटचे खिशात हात घालत होता. तेव्हा पोलिसांनी त्याचे खिसे तपासल्यावर त्यात ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने या नकली नोटा असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या, असे त्याने सांगितले. त्याला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली. त्याच्याकडील २५० नकली नोटा जप्त करण्यात आल्या.

https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील़ सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, सागर सुतकर, अभिजित बालगुडे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, महादेव नाळे, सागर कुंभार यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed