Sandeep Khardekar On Pune Traffic Jam | दहीहंडी उत्सवात नागरिकांची कोंडी ! गणेशोत्सवात वाहतूक नियोजन नीट व्हावे, संदीप खर्डेकर यांची मागणी

sandip khardekar

पुणे : Sandeep Khardekar On Pune Traffic Jam | शहरातील मुख्य पेठांमधील रस्त्यांवर तसेच प्रमुख रस्त्यांवर रोज वाहतूक कोंडीने सर्वसामान्य पुणेकर त्रासला आहे. अशातच दहीहंडी उत्सवात शहरातील सर्व प्रमुख रस्ते बंद असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. गणेशोत्सवात वाहतूक नियोजन नीट व्हावे व पुणेकरांना या कोंडीतून दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांच्याकडे केली आहे.

दहीहंडी उत्सवात पेठांमध्ये काल ‘‘अंदर से कोई बाहर ना जा सके, बाहर से कोई अंदर ना आ सके’’ अशी अवस्था पुणेकरांची झाली होती. अशीच अवस्था पालखी सोहळ्याच्या वेळी ही झाली होती.

उत्सव काळात वाहतूकीचे नियोजन करताना संपूर्ण शहराचा विचार करुन आणि सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून रचना केली पाहिजे. मात्र दहीहंडीत काल तसं घडताना दिसून आले नाही. दहीहंडी साजरी करणार्‍या मंडळानी अचानक रस्ते बंद केल्याने नागरिका अडकले आणि त्याचवेळी वाहतूक पोलिसांनी देखील बॅरिकेड लावून रस्ते बंद केले.

उदाहरणार्थ शहराच्या मध्य वस्तीतून गल्ली बोळातून फिरत फिरत शनिवारवाड्यासमोरील श्रीमंत बाजीराव पेशवा पुतळ्याजवळ आले तर तेथून बाहेर पडायला किंवा छत्रपती शिवाजी रस्त्याने आत जायला बॅरिकेड लावून बंदी घालण्यात आली होती. असे अनेक ठिकाणी घडत होते. आणि नागरिकांची अवस्था ‘‘अभिमन्यू, चक्रव्युह मे फंस गया है तू’’अशी झाली होती. आता तर गणेशोत्सवाचे मांडव पडत आहेत. देखावे उभारले जात आहेत. नदीपात्रातील रस्ता कधी बंद होईल, याची शाश्वती नाही. मध्य पुण्यात खरेदीची गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या काळात मध्य पुण्यात चारचाकीला बंदी घालता येईल का याबाबतची व्यवहार्यता तपासावी. अर्थात यातून शहरात राहणार्‍या नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच पावसामुळे नागरिकांचा चारचाकी वापरण्याकडे कल असतो, याचा ही विचार व्हावा.

तरी संपूर्ण शहराचा नकाशा मांडून त्यानुसार वाहतूक नियोजन करावे व नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा.
तसेच रस्ते पूर्णत: बंद करुन अनावश्यकरित्या वाहतूक कोंडीत भर घालू नये,
अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी केली. (Sandeep Khardekar On Pune Traffic Jam)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed