Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले – “आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
मुंबई : Sanjay Gaikwad On Badlapur Case | काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Badlapur School Girl Incident) केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरमधील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असून आरोपींना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.
यावरून शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनीही भाष्य केले आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Shivsena Shinde Group)
संजय गायकवाड म्हणाले, बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. विरोधातले सगळे पक्ष या मुद्द्यावरून थयथयाट करत आहेत. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत.
पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?, असे भाष्य संजय गायकवाड यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, मुळात अशा प्रकाराच्या घटना घडत असतात, त्या हाताळ्यासाठी एक व्यवस्था असते, राज्यात पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांकडून असे प्रकरणं हाताळल्या जात नसेल तर ती सीबीआयकडे सोपवली जातात. पण आरोपीला सोडलं जात नाही. पण अशा घटनांचं राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे.
पण असे प्रयत्न होताना दिसत नाही. विरोधक कुठलीही घटना घडली की त्याचं राजकारण करतात,
असे गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय