Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi | ‘शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते भाजपच्या संपर्कात’, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा, म्हणाले – ” सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात”

Sanjay Shirsat - Sharad Pawar

मुंबई : Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi | जयंत पाटील (Jayant Patil) काय शरद पवार (Sharad Pawar) देखील भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीत आणखी लोकं संपर्कात येतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. राज्याच्या महिलांसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) विरोधक आधी म्हणाले होते की, पैसे नाहीत तर ही एक घोषणा आहे.मात्र आता या योजनेला भरघोष प्रतिसाद मिळत असल्याने त्याला काउंटर करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे.

जयंत पाटील काय शरद पवार हे देखील भाजपच्या संपर्कात आहे. मविआतील सगळे आमच्या संपर्कात आहे, या गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात. मात्र ते आधीपासूनच आमच्या संपर्कात आहे. विधानसभा निवडणुकीत आणखी लोकं संपर्कात येतील आणि सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले, “बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर तेथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. याची तीव्रता राज्य आणि देशभर पाहायला मिळाली आहे. या घटनेचा बोध सर्वांनी घेतला आहे. यात राजकारण होऊ नये, पण काही लोक यात राजकारण करत आहेत. गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहेत. अशावेळी सरकारमध्ये कोण यापेक्षा एकत्र येऊन याचा धडा घेतला पाहिजे, मात्र काही जण केवळ मोर्चे काढत आहे.

बदलापूरच्या स्थानकावर आंदोलन करत राजकारण केले गेले. परिणामी काल लाठीचार्ज करावा लागला.
त्यामागील कारण म्हणजे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत होती.
आज राज्यात ९५ टक्के कॉलेज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत.
तिथे रॅगिंग होत नाही का? काही लोक मोर्चे काढत असून, लाडकी बहीण योजनेला काउंटर करण्यासाठी
या घटनेचं भांडवल केले जात असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?