Sanjay Shirsat On Sharad Pawar | ‘आजकाल शरद पवार पावसात जास्तच भिजतायेत’, शिंदे गटाच्या नेत्याची तिरकस टीका, म्हणाले – “पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी…”

Sanjay Shirsat - Sharad Pawar

मुंबई : Sanjay Shirsat On Sharad Pawar | बदलापूरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या (Badlapur School Girl Incident) निषेधार्थ (दि.२४) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पुण्यात पावसाला सुरुवात झाली (Pune Rains). पण पावसाला न जुमानता शरद पवार यांच्यांसह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्त्यानी भरपावसात आंदोलन केले. यावर स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन सुरु असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

शरद पवार आजकाल पावसात जास्तच भिजत आहे. लोकांना देखील वाटतं पावसात भिजल्याने निवडून येतो. आम्हाला देखील शॉवर लावून निवडणुकीत भाषण करावी लागतील, अशी तिरकस टीका शिरसाट यांनी केली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, आपापल्या पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. शरद पवार पुण्यात, उद्धव ठाकरे मुंबईत, आणि नाना पटोले ठाण्यात आपापल्या कार्यकर्त्यांसोबत बसले आहे. जे सरकारच्या हातात आहे ती सर्व कारवाई केली आहे.

सरकार कुणाचं आहे हे न पाहता सरकारला सूचना दिल्या असत्या तर समाजात एक संदेश गेला असता. काही लोकांना वेगळं काहीतरी करण्याची खाज आहे. आज त्यांच्या नाटकाचा भाग त्यांनी दाखवला, अशी टीका शिरसाट यांनी केली.

बदलापूर प्रकरणावरून महाविकास आघाडीकडून बंद पुकारल्यानंतर (Maharashtra Band) हायकोर्टाने बंदला परवानगी नाकारली (Mumbai High Court).
त्यानंतर महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले.
तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडूनही मविआ विरोधात आंदोलन करण्यात आले.
यावर सत्ताधारी पक्षाकडून प्रतिकात्मक आंदोलनाची गरज नव्हती म्हणत शिरसाटांनी मित्रपक्षांनाही घरचा आहेर दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed