Shivsena Shinde Group News | शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचे थेट छगन भुजबळांना आव्हान; म्हणाले – ‘भुजबळांविरोधात निवडणूक लढायला मी कधीही, केव्हाही आणि कुठेही तयार’
नाशिक: Shivsena Shinde Group News | विधानसभेच्या तोंडावर (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीत (Mahayuti) कुरघोडी सुरु असल्याचं चित्र आहे. महायुतीच्या मित्रपक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाच थेट आव्हान दिलं आहे.
https://www.instagram.com/p/DA742QEJvWD
यामुळे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघासाठी (Nandgaon Assembly Constituency) छगन भुजबळ यांनी समीर भुजबळांचे (Sameer Bhujbal) नाव येताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाने आदेश दिल्यास मी येवल्यातून लढण्यास तयार असल्याचे म्हणत त्यांनी भुजबळांनाच आव्हान दिले आहे.
https://www.instagram.com/p/DA71QCJpZ4P
सुहास कांदे (Suhas Kande) म्हणाले, ” लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. शिवसेना पूर्वीपासून आदेशावर चालत आला. एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील. माझ्या शिवसैनिकांना तो आदेश मान्य राहील. नांदगाव आणि येवला मतदारसंघ जवळच आहे.
https://www.instagram.com/p/DA7x4zvpCfZ
छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढायला मी कधीही, केव्हाही आणि कुठेही तयार आहे. मी भुजबळांना पाडेन असे मला वाटते. पाच वर्षातून एकदा यायचं, कार्यक्रम घ्यायचे. गेली १० वर्ष तुम्हाला जनतेने डोक्यावर घेतले पण तुम्ही लोकांचा विकास केला नाही, असा आरोपही त्यांनी भुजबळांवर केला.
https://www.instagram.com/p/DA7phM_C0_T
ते पुढे म्हणाले, ” तसेच पंकज भुजबळ, समीर भुजबळांना आव्हान आहे. तुमचा १० वर्षाचा विकास आणि माझा अडीच वर्षाचा विकास, कारण आधीचे अडीच वर्ष कोरोनात गेले, हे जनतेसमोर येऊ द्या. समोरासमोर चर्चा करू. पंकज भुजबळ, समीर भुजबळ हे राजकीयदृष्ट्या छोटे आहेत. माझे थेट मोठ्या भुजबळांना चॅलेंज आहे. आपण नांदगावात काय केले, समोर बसा, तुमच्यापेक्षा कमीत कमी ५०० कामे जास्त नसतील तर मी राजीनामा देईन.
https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU
” जनता हुशार आहे. ज्याचा त्याचा इतिहास आहे. इतिहासानुसारच प्रत्येक जण वागतं. बाळासाहेबांसोबत काय झाले, शरद पवारांसोबत काय झाले, आता या पक्षासोबत काय झाले हे जनतेला माहिती आहे. भुजबळांचा इतिहासच प्रत्येकासोबत राजकीय हेतूने काय केले हे माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DA79178psxU
महायुतीसोबत छगन भुजबळ असं करत असतील तर ते नवीन नाही. त्यांचा इतिहासच आहे.
कधीकधी माझ्यावर राजकीय प्रेम जास्त असेल म्हणून भुजबळ मतदारसंघात कार्यरत असतील”, असा टोला आमदार कांदे यांनी छगन भुजबळांना लगावला.
https://www.instagram.com/p/DA76aE-Jqon
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण