Shivsena Shinde Group On Shivsena UBT | ‘तुमचं सरकार आलं तर…’, शिवसेना शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “काँग्रेसचं उपरणं घातलेले लोक…”
मुंबई : Shivsena Shinde Group On Shivsena UBT | आगामी विधानसभा निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) पुढील दोन ते तीन महिन्यात पार पडतील अशी चर्चा आहे. दरम्यान बैठका, मेळावे, सभा घेतल्या जातात आहेत. पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संशयी आत्मा आहेत, अशी घणाघाती टीका केली. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
तुमचं सरकार आलं तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा. महिलांना एसटीने अर्ध्या तिकीटात प्रवास दिला जातो ते बंद करा, ज्या लोकांना मोफत धान्य दिलं जातं तेही बंद करा आणि घरी बसा. घरी बसून व्हिडीओ कॉन्फरन्सवरून सर्वांना शुभेच्छा देत बसा, अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली.
संजय शिरसाट म्हणाले, काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेसचं उपरणं घातलेले लोक आमच्यावर टीका करण्याच्या पात्रतेचे राहिले नाहीत.
त्यामुळे आम्ही त्यांच्या टीकेला उत्तरही देणार नाहीत. आमचं सरकार फक्त आश्वासन देणारे नाही, तर काम करणारे सरकार आहे.
आता संजय राऊत यांच्या बोलण्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही. ते रोज काहीतरी बडबड करतात.
संजय राऊतांनी ठाकरे गटाची आणि शरद पवार गटाची वाट लावली.
त्यामुळे हे वाट लावणारे लोक दुसऱ्यांना काय वाट दाखवतील,
अशी टीकाही शिरसाट यांनी केली आहे. (Shivsena Shinde Group On Shivsena UBT)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे