Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ! श्री महालक्ष्मी मंदिर व हरजीवन हॉस्पिटल यांच्यातर्फेआयोजन; रक्तदान शिबीराचेही आयोजन
पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग व हरजीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १६ ते २० आॅक्टोबर २०२६ या कालावधीत सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे होणार आहे, अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.
शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांसह मंदिराचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
शिबिरात नाडी, रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा तपासण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सीबीसी, थायरॉईड कार्यक्षमता, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक अॅसिड आणि जीवनसत्त्व बी १२ या रक्ततपासण्यांची सुविधाही उपलब्ध असेल.
तसेच महिलांसाठी दि. १८ ऑक्टोबर रोजी मॅमोग्राफी, तर दि. १७ व १८ ऑक्टोबर रोजी हाडांच्या घनतेची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच दि. १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. नोंदणी व अधिक माहितीसाठी 7517569929 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
