Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | श्री महालक्ष्मी मंदिरात केसरी टुर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्या हस्ते महिला इंटरप्रिनर्संचा सन्मान
पुणे : Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | श्री महालक्ष्मी मंदिरात केसरी टुर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजविलेल्या महिला इंटरप्रिनर्स यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त भरत अग्रवाल, मुकुंद कुलकर्णी, अॅड. प्रताप परेदशी, प्रवीण चोरबेले, विशाल सोनी आदि मान्यवर उपस्थित होते.
अरुणा गुळुंजकर, दुर्गा पवार, किती शेट्टी, नेहा भोसले, धनश्री बधाने, स्नेहा भट्टाचार्य, स्वप्ना पुरोहित, संजिवनी माहिरे, किती ढमाल दामले, वैशाली रावळ, रश्मी वर्मा, प्रियांका गुप्ता, मिताली मोरे, पल्लवी सोमण, अलिशा नागराज, इशिता थिटे, हर्षा सोमण, मुस्कान तिवारी, अस्मी सोहनी, लिना गावंडे, अनघा वैद्य, संध्या नायर, मानसी करमरकर, सुरेखा पाठक, पल्लवी गुंडगे, शेलिना राजावत, शिवांजली पाटील, ऋतुजा लिंगमपल्ली, सुश्मिता काणेरी, साक्षी चोपडा, नमिता राठोड, मंजुषा वाघ, पूर्वा भिडे, केसर पटेल, स्वप्नाली घुमारे, सारिका निफाडकर, श्रावणी खरात, सृष्टी रासकर, खुशी राठोड, निकिता आखाडे, चित्रा कोकाटे, मनश्री नाईक यांचा सन्मान करण्यात आला.
भरत अग्रवाल म्हणाले की, नवरात्रोत्सवात आपण देवीची उपासना करतो. त्यानिमित्ताने आपल्या आजू बाजूला असणार्या खर्या देवीची पुजा करण्याचा, त्यांच्या कार्याला वंदन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. या वर्षी शेतकरी महिला व कृषी उद्योजिका, महिला शास्त्रज्ञ, महिला वैमानिक, महिला पोलीस अधिकारी, मानवी संसाधन क्षेत्रातील महिला अधिकारी, स्टार्टअप वुमन अशा विविध क्षेत्रातील स्त्रीशक्तींचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली.
झेलम चौबळ म्हणाल्या की, आज आजू बाजूला इतक्या नवदुर्गा पाहायला मिळाल्या की आनंद होतो. या नवदुर्गा हीच मोठी शक्ती आहे. तुम्ही एक शक्तीपीठ आहात. मी सप्त खंडात फिरले असले तरी भारतासारखा देश नाही. आपल्यासारख्या परंपरा मला याच कारणावरून भावतात. मी मुलांना संदेश दिला की, तुमच्या आयुष्यात येणार्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा. तिच्याकडे शक्ती आहे, हे मान्य केले तर तुमचे आयुष्य सुखी होईल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेता करपे आणि मोनिका सामृतवार यांनी केले.
