Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | बारमध्ये झालेल्या वादातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून करण्यात आला (Murder Of Criminal). गोट्या ऊर्फ अमोल शेजवळ Gotya Alias Amol Shejwal (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रोड) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना सिंहगड रोडवरील वीर बाजी पासलकर (वडगाव) पुलाजवळील क्लासिक बारबाहेर रात्री साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पुलाजवळील क्लासिक बारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गोट्या शेजवळ व त्याचे मित्र दारु पिण्याकरीता बसले होते. दारु पिल्यानंतर गोट्याचा तोल जातो व तो मोठमोठ्याने बडबड करु लागतो. नेहमीप्रमाणे आजही गोट्याचा तोल सुटला. तो मोठ मोठ्याने बडबडू लागला. तेथे बसलेल्या इतर ग्राहकांच्या टेबलवर जाऊन त्यांना त्रास देऊ लागला. तेव्हा आकाश कुलकर्णी याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो कोणाला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने आकाश कुलकर्णी याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला हॉटेल बाहेर जाण्यास सांगितले. त्याला व त्याच्या मित्रांना बाहेर काढले. बाहेरही तो बाऊन्सरबरोबर वाद घालू लागला. तेव्हा आकाश याने बारशेजारी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानातील हातोडी आणून त्याने गोट्याच्या डोक्यात मारली. वर्मी घाव बसल्याने गोट्याचा जागीच मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, तसेच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव, समीर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, अक्षय चव्हाण आदी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
आकाश कुलकर्णी याचे अगोदर हॉटेल होते. काही कारणाने ते बंद पडले.
त्यानंतर क्लासिक बारमध्ये तो भागीदार असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांनी तो बाऊन्सर असल्याचे सांगितले आहे. (Sinhagad Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे