Sinhagad Road Pune Crime News | कोयत्याने वार करुन इस्टेट एजंटचा निर्घुण खुन ! सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीतील घटना, आर्थिक वादातून झाला प्रकार

Murder of the estate agent

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटावर (Murder Of Estate Agent) पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्याचा निर्घुण खुन केला. आर्थिक वादातून हा खुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Murder Case)

सतीश सुदाम थोपटे Satish Sudam Thopte (वय ३८, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे खुन झालेल्याचे नाव आहे. सतीश थोपटे याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी हवेली पोलिसांनी भाऊ किवळे व त्याच्या चार साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sinhagad Road Pune Crime News)

सतीश हा बुधवारी दुपारी चार वाजता आपल्या घराजवळील सुशिला पार्क येथील रस्त्यावर उभा होता. त्यावेळी चार ते पाच जणांचे टोळके हातात कोयते घेऊन तेथे आले. त्यांनी सतीश थोपटे याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सतीश पडल्यानंतर हे टोळके पळून गेले. सतीश याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.

सतिश भोपटे याच्या नावावर भाऊ किवळे याने फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. भाऊ कर्जाचे हप्ते भरत नसल्याने त्याच्या नोटिसा सतीश थोपटे याच्या नावावर येत होत्या. त्यामुळे हप्ते भरण्याच्या कारणावरुन त्यांच्या वारंवार वाद होत होते. या प्रकारावरुन चिडून जाऊन भाऊ किवळे याने साथीदारांच्या मदतीने भर दुपारी कोयत्याने वार करुन त्यांचा खुन केला. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (PI Sachin Wangde) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed