Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)
भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यासाठी घेऊन त्याचाच केला खून; उपकाराची अशी केली परतफेड, चौघांना हवेली पोलिसांनी केली अटक
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | जमीन खरेदी विक्रीचा व्यवसायात ते भागीदार होते. भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेऊन घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता, त्याचाच खून करुन अशी उपकाराची परतफेड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हवेली पोलिसांनी (Haveli Police) सतीश थोपटे यांचा खुन (Satish Thopte Murder Case) करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.
https://www.instagram.com/reel/DC-90g4p411/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
जीवन ऊर्फ बाळा शैलेश जगताप (वय २७, रा. भंडारी हॉटेलच्या मागे, दत्तवाडी), अक्षय ऊर्फ बाबु बालाजी शेलार (वय २४, रा. शिवरे, ता. भोर), साहेल ऊर्फ फुक्या साजिदअली जोरा (वय १९, रा. शिवरे बस स्टँडशेजारी, ता. भोर), देविदास ऊर्फ देवा लक्ष्मण तांबट (वय २०, रा. कांजळे, तांबट आळी, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Estate Agent Murder Case)
सतिश सुदाम थोपटे (वय ३७, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याबाबत अनिता सतिश थोपटे (वय ३१, रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश थोपटे आणि भाऊसाहेब सदाशिव किवळे (रा. धायरी फाटा) यांचा भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. सतिश थोपटे यांनी फ्लॅटवर कर्ज काढून कर्जाची रक्कम १८ लाख ५० हजार रुपये भाऊसाहेब किवळे याला दिले होते. हे कर्ज भाऊसाहेब किवळे हे भरणार असे ठरले होते. परंतु, कर्जाची रक्कम न भरल्याने सतिश थोपटे यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. पैसे मिळत नसल्याने सतिश थोपटे यांनी भाऊसाहेब किवळे याने कर्ज भरले नसून त्याची कर्ज भरण्याची लायकी नाही, असा मजकूर व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. त्याचा राग मनात धरुन भाऊसाहेब किवळे याने त्याचे चार साथीदारांना पाठवून सतिश थोपटे याचा कोल्हेवाडी येथील घरासमोर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी कोयत्याने वार करुन खुन केला.
लोकवस्तीत भरदिवसा हा गुन्हा घडला असलयाने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करुन गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात चार अनोळखी गुन्हेगार कोयत्याने मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची ओळख पटविण्याकरीता बातमीदारांकडे संपर्क केल्यानंतर त्यातील एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार देवा लक्ष्मण तांबट हा असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने त्यांचा शोध घेत असताना चारही आरोपी खेड शिवापूर परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने ताबडतोब कारवाई करत चारही आरोपींना पकडले. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास कामी आरोपींना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवीदास ऊर्फ देवा तांबट याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी भाऊसाहेब किवळे याचा शोध सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
हवेलीचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते,
पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, अंमलदार हनुमंत पासलकर, रामदास बाबर, राजू मोमीण, मंगेश थिगळे, अमोल शेडगे,
मंगेश भगत, वैभव सावंत, काशिनाथ राजापुरे, हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार,
पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे, पोलीस अंमलदार विकास प्रधान, राजू मुंढे, संतोष तोडकर, महेंद्र चौधरी यांनी केली आहे. (Sinhagad Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी