Sinhagad Road Pune Crime News | सराईत गुन्हेगारासह अल्पवयीनांकडून जप्त केले दोन पिस्टल, चार जिवंत काडतुसे ! सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

Pune Crime News | Dhayari: Externed Man Held for Allegedly Brandishing Sickle and Threatening Residents; Nanded City Police Make Arrest

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | हिंगणे खुर्द (Hingne Khurd) येथे पिस्टल बाळगून बाचाबाची करणार्‍या तिघांना पकडून सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) त्यांच्याकडून दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. (Pistol Seized)

राज रवींद्र जागडे (वय २२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्या दोन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांचे सहकारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार स्वप्निल मगर, विनायक मोहिते व शिवाजी क्षीरसागर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन ते तीन जणांकडे गावठी पिस्टल असून ते नवीन कॅनॉल रोडवरील आनंदवन हेरिटेज बिल्डिंगजवळ उभे आहेत. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक तातडीने खासगी गाडीने तेथे निघाले. ते हिंगणे खुर्द येथे पोहचले तेव्हा तिघे जण एकमेकांसोबत बाचाबाची करत असल्याचे दिसून आले. पोलिसांची आणि त्यांची नजरानजर होताच ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन काही अंतरावर पकडले. राज जागडे याच्या अंगझडतीमध्ये ४० हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळाले. अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यातून ४० हजार रुपयांचे पिस्टल व तीन जिवंत काडतुस मिळून आले. राज जागडे याच्याविरुद्ध यापूर्वी राईटचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, बाबा उत्तेकर,
पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, पंकज देशमुख, अमोल पाटील, विनायक मोहिते, स्वप्निल मगर, शिवाजी क्षीरसागर,
राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विका बांदल यांच्या पथकाने केली आहे. (Sinhagad Road Pune Crime News)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed