Sunil Kedar Plea Rejected In High Court | हायकोर्टाने सुनील केदार यांची याचिका फेटाळल्याने राजकीय भवितव्य टांगणीला

sunil kedar

नागपूर: Sunil Kedar Plea Rejected In High Court | काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांना दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल समोर आला असून हायकोर्टाने केदार यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना आता सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा तसेच साडे बारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी राज्यघटनेच्या कलम १९१ (१) व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८३ (३) अन्वये सुनील केदार यांना आमदार म्हणून अपात्र ठरविले होते. (Sunil Kedar Plea Rejected In High Court)

त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती. बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर
आता शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात केली होती.
हायकोर्टाने केदार यांची याचिका फेटाळल्याने त्यांना आता सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed