Supriya Sule | ‘आमच्या नेत्याच्या केसाला धक्का जरी लागला तर बघा काय होतं’, मालवणमधील राड्यावर सुप्रिया सुळेंचा इशारा
बारामती : Supriya Sule | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली.
यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), जयंत पाटील (Jayant Patil), माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा समावेश आहे. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणेही (Nitesh Rane) त्या ठिकाणी आले. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी बघा असा इशारा दिला आहे. (Supriya Sule)
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तिथे कायदा आणि सुव्यवस्था काय करते आहे, पोलिस यत्रंणा काय करत आहे. पोलिसांची यत्रंणा आहे ना तिथे, आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं.याबाबत नेत्यांनी काल दिवसभर माध्यमांनी सांगितलं होतं, मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे, गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे.
मी बारामतीत आहे, मला जास्त काही माहिती नाही. नेमकं काय सुरू आहे, ते माहिती नाही,
पण माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे, शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे.
काल आमचे नेते जाणार हे सर्वांना माहिती होतं,
मग पोलिस आणि बाकी यत्रंणा काय करत होती असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.
तर आमच्या सर्व नेत्यांनी सुरक्षितता आणि जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे.
आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का लागला तर बघा काय होतं, असं म्हणत सुळेंनी इशारा दिला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून