Sus Road Pune Crime News | सूस रोडवरुन कार चोरणारे चोरटे जाळ्यात; चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी
पुणे : Sus Road Pune Crime News | सूस रोडवर पार्क केलेली कार चोरुन (Vehicle Theft Detection) नेणार्या दोघा चोरट्यांना पकडण्यात चतु:श्रृंगी पोलिसांना (Chaturshrungi Police Station) यश आले आहे. महेश श्यामराव शिळीमकर Mahesh Shyamrao Shilimkar (वय २७, रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि गोविंद हरिचरण गौतम Govind Haricharan Gautam (वय २३, रा. सुतारवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत दर्शन प्रशांत बोंदार्डे (वय ३०, रा. श्रद्धा, शिक्षक कॉलनी, सूस रोड, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बोंदार्डे यांनी सूस रोडवरील वाकेश्वर चौकाजवळ टाटा कंपनीची टिगोर ही कार ८ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता पार्क केली होती. सकाळी सव्वा दहा वाजता त्यांनी येऊन पाहिले तर ६ लाख ५० हजार रुपयांची गाडी चोरीला गेली होती. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार तपास करीत असताना आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी (Pune Police) दोघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांची कार हस्तगत केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar),
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने (ACP Anuja Deshmane), वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi), पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे (PI Yuvraj Nandre) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले (PSI Pranil Chaugale), पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार बाबुलाल तांदळे, सुधाकर माने, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, विशाल शिर्के, किशोर दुशिंग, श्रीधर शिर्के, पोलीस अंमलदार प्रदिप खरात, बाळासाहेब भांगले यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे