Taambdi Chaamdi Song | ‘तांबडी चांबडी’ गाण ठरलं आंतरराष्ट्रीय संगीत रेकॉर्ड लेबलवरील पहिलचं मराठी गाण; ‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

Taambdi Chaamdi Song

मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलच, आंतरराष्ट्रीय स्पिनिंग रेकॉर्ड लेबलवर ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाण प्रदर्शित!

ठाणे : Taambdi Chaamdi Song | ‘मराठी वाजलाचं पाहिजे’ असे उच्चार होतात तेव्हा आपसूकच एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे आपला मराठमोळा क्रेटेक्स. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाण आता जगभरात गाजणार आहे. जगभरातील लोक हे गाण आता बघू आणि ऐकू शकतात. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या ऑफिशल चॅनेलवर क्रेटेक्सच ‘तांबडी चांबडी’ गाण प्रदर्शित झाल आहे. आणि त्या लेबलवरील हे पहिलच मराठी गाण आहे.

संगीतकार क्रेटेक्स (कृणाल घोरपडे) याचे ‘तांबडी चांबडी’ या गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण होत आहे. त्याने या गाण्याच पार्श्वसंगीत केलं आहे तर श्रेयस सागवेकर याने हे गाण लिहिलं असून गायलं आहे. या गाण्याची निर्मिती वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी केली आहे. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे या कलाकारांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

या गाण्याचा संगीत अनावरण सोहळा नुकताच ठाण्यातील आय लिफ बँक्वेट्स येथे पार पडला. या सोहळ्याला संगीतकार क्रेटेक्स, गायक श्रेयस, ‘तांबडी चांबडी’ गाण्याची संपूर्ण टीम तसेच हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप, स्टँडप कॉमेडियन अनिश गोरेगांवकर, भाडिपा टीम आणि सागरिका म्युझिक चैनल हेड सागरिका दास असे नामवंत मान्यवर उपस्थित होते.

‘तांबडी चांबडी’ गाण्याविषयी संगीतकार क्रेटेक्स सांगतो, “माझा आनंद गगनात मावत नाही आहे. माझ स्वप्न होत की माझं गाण स्पिनिंग रेकॉर्डस वरती कधीतरी याव. ज्या रेकॉर्ड लेबलवरती जगभरातील डेव्हिड ग्वेट, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक, डिमिट्री व्हेग्स एंड लाइक माइक, हार्डवेल, स्टीव्हओकी अश्या सुप्रसिद्ध कलाकारांची गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. आणि आता या विविध भाषेमधील गाण्यांमध्ये आपलं मराठी गाण प्रदर्शित होण. माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याच्या ऑडियोला भारतातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे आम्ही व्हिडीओच्या स्वरूपात गाण तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.
आणि आता लवकरच मी परदेशात मराठी गाण्याचे शो करत आहे. प्रेक्षकांच प्रेम कायम असच राहो.
आणि मराठी भाषा, मराठी गाणी देशात नव्हे तर परदेशातही वाजू दे हीच सदिच्छा.
येत्या १ सप्टेंबरला पुण्यातील बॉलर येथे मराठीतील सर्वात मोठा शो होणार आहे.
तेव्हा पुणेकर आणि सर्व प्रेक्षकांनी जरुर या शो ला या.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed