Vishalgad Violence | सकल हिंदू समाजाच्या वतीने 19 जुलैला कोल्हापूर बंदचा इशारा

Vishalgad Violence

कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार प्रकरणावरून (Vishalgad Violence) कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण या हिंसाचारात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी कोल्हापुरात मोर्चा (Protest In Kolhapur) काढणार असल्याची घोषणा केली आहे. पण याला सकल हिंदू समाजानं (Sakal Hindu Samaj) विरोध दर्शवला असून १९ जुलै रोजी कोल्हापूर बंदची (Kolhapur Band) हाक देण्याचा इशारा दिला आहे.

विशाळगड हिंसाचारप्रकरणी इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्चाला सकल हिंदू समाजानं कडाडून विरोध दर्शवला आहे. इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत करू तसंच या घटनेविरोधात एमआयएमने कोल्हापुरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला सकल हिंदू समाजाच्यावतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता संघटनेचे (Hindu Ekta Sangathna) जिल्हाध्यक्ष दीपक देसाई (Deepak Desai) यांनी दिला आहे. (Vishalgad Violence)

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati)
यांनी गडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली
असून त्याअंतर्गत त्यांनी आपल्या समर्थकांना चलो विशाळगडचा नारा दिला होता.
पण संभाजीराजे विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच तेथील परिसरात हिंसाचार झाला.
तेथिल घरे आणि दुकानांची जाळपोळ झाली.
या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला होता.
याबाबत पोलिसांनी (Kolhpur Police) कारवाई सुरु केलेली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed