Vishrantwadi Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे केले शारिरीक शोषण; रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे : Vishrantwadi Pune Crime News | महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी एका रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. राकेश सुनिल सरोदे (वय ३१, रा. विश्रांतवाडी) असे त्याचे नाव आहे. (Rape Case)
याबाबत एका २५ वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिसांकडे (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दोन मुलांसह रहात आहे. त्यांचे पतीबरोबर कौटुंबिक न्यायालयात वाद सुरु आहे. फिर्यादी यांची २०२३ मध्ये राकेश सरोदे याच्याशी ओळख झाली. राकेश रिक्षाचालक असून त्याच्या रिक्षात बसून त्या गेल्या होत्या. त्यातून त्यांची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली.
त्यानंतर प्रेमसंबंधात रुपांतर झाले. त्याने आपलेही पत्नीबरोबर पटत नाही. तिला घटस्फोट देणार असून आपण लग्न करु असे त्याने सांगितले. त्यानंतर १८ सप्टेबर २०२३ रोजी त्याने फिर्यादी यांना त्याच्या घरी नेले. तेथे त्यांच्याशी शारिरीक संबंध केला. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करु, असे सांगून त्याने वारंवार त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले. १ ऑगस्ट रोजी याच कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर त्याने संपर्क तोडला असून फिर्यादी यांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक कांचन जाधव (PI Kanchan Jadhav) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे