Vishrantwadi Pune Crime News | लातूरहून येऊन घरफोडी करणार्‍या चोराच्या आवळल्या मुसक्या; 4 गुन्ह्यातील चार लाखांचा ऐवज हस्तगत

Arrest

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | लातूर येथून येऊन पुण्यात घरफोडी करणार्‍या चोरट्यास विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) लातूर येथून अटक केली. त्यांच्याकडून ४ गुन्ह्यातील ३ लाख ८५ हजार ९५० रुपयांचा माल जप्त केला आहे. (House Burglary Case)

https://www.instagram.com/p/DA7urODi2oM

शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर) असे या चोरट्याचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीतील घरफोड्या, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. पोलीस अंमलदार संजय बादरे, अमजद शेख, वामन सावंत व किशोर भुसारे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, घरफोडीमधील आरोपी सध्या त्याच्या मोघा गावी आहे. त्यानुसार पोलीस पथक लातूर जिल्ह्यातील मोघा गावी गेले. त्यांनी शेखर जाधव याला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरलेला मोबाईल पॉवर बँक व कार चार्ज असा १ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा माल हस्तगत केला.

https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU

त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, चंदननगर व भोसरीमधून चोरलेल्या दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण ३ लाख ८५ हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीकडून मुंढवा, चंदननगर, भोसरी, हडपसर पोलीस ठाण्यातील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

https://www.instagram.com/p/DA7phM_C0_T

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे. (Vishrantwadi Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA71QCJpZ4P

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed