Wagholi Pune Accident News | अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ! वाघोलीत डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी गंभीर जखमी
आमदार अशोक पवार यांनी स्वतःहा उचलून पाठविले उपचारासाठी
शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Wagholi Pune Accident News | पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली मध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे.पुन्हा एकदा गुरुवारी सकाळी वाघोलीत डंपरच्या धडकेने एका तरुणीला आपला पाय गमवावा लागला आहे. सकाळच्या सुमारास अवजड वाहनांना बंदी असताना सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाता दरम्यान तेथून आमदार अशोक पवार जात होते, त्यांनी तात्काळ त्या तरूणाला आपल्या कार मधून रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
https://www.instagram.com/p/DA8XlQGJpCD
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा बाळासाहेब मंडलिक ( वय २३, रा. वाघोली ) ही तरुणी वाघोलीत पुणे नगर महामार्गावरून रस्ता ओलांडत होती. छत्रपती श्री शिवाजी पुतळ्याजवळ तिला डंपरची धडक बसली. तिच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने ती विव्हळत होती. यावेळी आमदार अशोक पवार हे तेथून एका दशक्रिया विधी साठी जात होते. त्यांच्या कार चालकाने आरशात हा अपघात पहिला. त्यांनी ही बाब त्वरित आमदार पवार यांना सांगितली. आमदार अशोक पवार यांनी तत्काळ तेथे धाव घातली. कार मधील शाल तिला लपेटून आपल्या कार मधून वाघोलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तरुणी गंभीर असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करुण्यात आले. यानंतर तिला रुग्णालयातून पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी पुण्यातील दवाखान्यात सोबत त्यांचे स्विय सहायकही त्यांनी ही पाठविले. सकाळी ७ ते ११ डंपर वाहतुकीला बंदी असूनही पोलिसांचा आदेश झुगारून डंपर चालक वाहतूक करीतच आहेत.
त्यामुळे आता या डंपर वरती लोणीकंद वाहतूक शाखा, लोणीकंद पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे
https://www.instagram.com/p/DA8VI9QCXkB
मदतीसाठी जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त यांना फोन
अपघातानंतर तरुणीला पुण्यातील रुबी हॉल मध्ये नेण्यात आले. मात्र तेथे अति दक्षता विभागात खाट नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. हे कळताच आमदार अशोक पवार यांनी जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांना फोन केले. ज्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले त्यांना रुबी मध्ये खाट उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली.
https://www.instagram.com/p/DA8RujVJ0yp
दीड तासानंतर उपचार सुरू
त्या गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी रुबी हॉल मध्ये नेल्यानंतर तब्बल दीड तास त्या महिलेला रुग्णवाहिकेत उपचाराची वाट बघावी लागली. डॉक्टरांनी तिच्या वर उपचार देखील केले नाही. दीड तासानंतर तिला आत घेतले. याबाबत आमदार अशोक पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
https://www.instagram.com/p/DA8QelrptCP
जिल्हाधिकारी यांच्याबाबतही नाराजी
त्या महिलेच्या उपचारासाठी खाट मिळावी यासाठी आमदार पवार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनाही फोन केला. त्यांनी त्यांचा फोन घेतला नाही. पुन्हा पवार यांच्याशी दुपारी १२ पर्यंत त्यांनी संपर्कही केला नाही. याबाबत ही पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
https://www.instagram.com/p/DA8EswHp786
….तर ब्रेक लागणार कसा
डंपर मध्ये क्षमतेपेक्षा अती प्रमाणात खडी, क्रश सॅन्ड भरली जाते. अती क्षमतेमुळे या वाहनांचे ब्रेक लागत नाही. त्यामुळे अपघात होतात. तर चालकाला एका फेरी मागे २०० ते ३०० रुपये जास्त दिले जातात. त्यामुळे ते जास्त फेरी करण्याच्या नादात भरघाव डंपर चालवतात. त्यातून अपघात होतात.
https://www.instagram.com/p/DA8DN7lpPyJ
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण