Wagholi Pune News | वाघोलीतील गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली (Video)

Ganesh Immersion procession in Wagholi

पुणे : Wagholi Pune News | शहराच्या उपनगरातील गणेशोत्सवाचे धुमधडाक्यात विसर्जन होत असून पुण्याच्या उपनगरातील वाघोली मध्ये गणेश उत्सवाच्या नवव्या दिवशी वाघोली परिसरातील जवळपास २५ गणेश मंडळांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले यावेळी प्रत्येकाने ट्रॅक्टरवर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केले होते, देखाव्याबरोबर डीजेच्या थप्पी सह प्रखर लाईट पाहायला मिळाल्या, सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक रात्री एक वाजता संपल्याने पुणे नगर महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगला लागल्या होत्या, तर डीजेच्या तालावर तरुणाई भर रस्त्यावरच बेधुंद होत थिरकत होती, त्यामुळे पुणे नगर रोडवर नगर कडून पुण्याकडे तर पुण्याकडून नगर कडे जाणारी वाहतूक दोन्ही बाजूने अत्यंत संत गतीने सुरू होती त्यामुळे जवळपास पाच ते सात किलोमीटरच्या लांबच लांब रांगा दोन्ही साईटने लागल्याने पुण्याकडून नगरकडे व नगर कडून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला ,यामध्ये अनेक रुग्णवाहिका अडकल्याने रूग्णांचे देखील प्रचंड हाल झाले.

https://www.instagram.com/reel/C_-CHuUJd1J/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

डीजेच्या आवाजामुळे वाघोली परिसरात प्रचंड ध्वनी प्रदूषण झाले होते, या दोन्ही प्रदूषणाचा शेजारील हॉस्पिटल, नागरिक लहान मुले, महिला, आजारी वृद्ध यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे होते प्रत्येक मंडळाला वेळेतच रस्त्यावर येऊन मिरवणूक सुरू करून वेळेतच समाप्त करण्याबाबत आदेश देणे गरजेचे होते, ध्वनी प्रदूषणाबाबत देखील योग्य नियम घालून देणे गरजेचे होते.

पोलीस प्रशासनचा ढिसाळ कारभारामुळे वाघोलीतील गणेश विसर्जन मिरवणूक खूप वेळ रेंगाळली
तसेच ध्वनी प्रदूषणाचा देखील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असल्याचे
आता स्थानिक नागरिक, वाहन चालक बोलत आहे.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवरती
पुणे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed