Wanwadi Pune Crime News | शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा एक हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या बाऊंसरांनी घरात शिरुन केली मारहाण, वानवडी पोलिसांनी दोघांना अटक

marhan (1)

पुणे : Wanwadi Pune Crime News | मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे २४ हप्ते व्यवस्थित भरले. भाच्याचा अपघात झाल्याने एक हप्ता भरता आला नाही. केवळ १८ हजार रुपयांचा एक हप्ता थकल्याच्या कारणावरुन कंपनीच्या मॅनेजरने घरी बाऊन्सर (रिकव्हरी कर्मचारी) पाठविले. या बाऊन्सरांनी बेकादेशीरपणे घरात शिरुन दोघांना मारहाण केली. वानवडी पोलिसांनी या दोघा बाऊन्सरांना अटक केली आहे.

आकाश पुरुषोत्तम सापा (वय ३२, रा. भवानी पेठ), ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बजाज फायनान्स कंपनीचा मॅनेजर हर्षद जिमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वानवडीतील शांतीनगरमध्ये राहणार्‍या एका ४६ वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या शांतीनगरमधील घरात २७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वत: बँकेतून कर्ज काढण्यासाठी मदत करत असतात. त्यांनी शिवाजीनगर येथील बजाज फायनान्समधून मुलीच्या शिक्षणाकरीता ७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील ४३ हजार रुपये इन्शुरन्सचे कपात केले. प्रोसिसिंग फी वगैरेचे पैसे कट करुन त्यांच्या खात्यात ६ लाख ८५ हजार रुपये देण्यात आले. त्यांना १८ हजार ७० रुपयांचा हप्ता ठरवण्यात आला होता. त्यांनी २४ हप्ते नियमितपणे भरले. त्यांच्या १७ वर्षाच्या भाचाचा अपघात झाला. त्याला औषधोपचाराची गरज असल्याने त्यांनी आर्थिक मदत केली होती. त्यामुळे त्यांना २ मार्चचा हप्ता भरता आला नव्हता. त्यामुळे २५ मार्च पासून त्यांना मोबाईलवर फोन करुन शिवीगाळ, धमक्या दिल्या जात होत्या. ते स्वत: २६ मार्च रोजी बजाज फायनान्सच्या वाकडेवाडी कार्यालयात जाऊन हप्ता भरण्यास विलंब झाल्यामागील कारण सांगितले. तेव्हा तेथील रिकव्हरी मॅनेजर जोशी यांनी त्यांना ४ ते ५ दिवसात हप्ता भरा असे सांगितले.

असे असताना दुसर्‍या दिवशी २७ मार्च रोजी सायंकाळी ते व त्यांचे भाऊ घरात असताना दोघे जण घरी आले. त्यांनी आम्ही बजाज फायनान्सकडून आलो, असे सांगितले. त्यांच्याकडे आय कार्ड विचारल्यावर त्यांनी आम्हाला तू कोण विचाणार, असे म्हणाले. त्यांनी आपले जोशी साहेबांचे बोलणे झाले आहे. तीन चार दिवसात राहिलेला हप्ता भरणार असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी हप्ता भरता येत नसेल तर लोन कशाला काढता, असे म्हणून शिवीगाळ केली. फिर्यादी व त्यांच्या भावाला हाताने मारहाण केली. तेव्हा त्यांनी घरातून बाहेर व्हा, असे म्हणाले. त्यावर आम्ही हप्ता घेतल्याशिवाय जाणार नाही, असे म्हणून घरात बसून राहिले. शेवटी त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिस आले व त्यांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मॅनेजर हर्षद जिमन याच्या सांगण्यावरुन घरी आल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघा बाऊन्सरांना अटक केली आहे. सहायक पोलीस फौजदार साबळे तपास करीत आहेत.

You may have missed