Warje Malwadi Pune Crime News | मालकाला परस्पर सांगून मित्रांना कामाला लावल्याने सुपरवायझरने केली सुरक्षारक्षकाला मारहाण

marhan

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | उत्तर प्रदेशातून आलेल्या दोन मित्रांना थेट मालकाला सांगून कामाला लावल्याचा राग धरुन सुपरवायझरने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण (Bedum Marhan) केली.

https://www.instagram.com/p/DAi-ViLiUAS

याप्रकरणी राहुल कुमार हरि किशन यादव (वय १९, रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुपरवायझर निलेशकुमार यादव (वय ४२) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAi797FCK_K

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल कुमार यादव हे हरिनारायण द्विवेदी यांच्या एस जी सिक्युरिटी एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांचे सुपरवायझर निलेशकुमार यादव आहेत. त्यांच्या गावाकडून दोघे मित्र आले होते. त्यांनी निलेशकुमार यादव यांना न सांगता थेट मालक द्विवेदी यांना सांगून सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लावले. त्याचा निलेशकुमार याला राग आला. फिर्यादी हे २८ सप्टेबर रोजी सारथी सोसायटीमध्ये कामावर होते.

https://www.instagram.com/p/DAi2JUQpeo1

यावेळी निलेशकुमार यादव तेथे आला. तुला लय मस्ती आली का, माझ्या परस्पर दुसरी पोर मालकाकडे कामाला लावतो, असे म्हणाला. वॉचमन टेबलावर असलेली काठी घेऊन त्याने फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मनगटावर, डाव्या पायाच्या मांडीवर, गुडघ्यावर मारहाण करुन दुखापत केली. शिवीगाळ करुन तुला येथे कामाला येऊन देणार नाही, तु गावाला निघुन जायचे, नाही तर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादी यांचा मोबाईल आपटून फोडून टाकला. पोलीस अंमलदार खटके तपास करीत आहेत. (Warje Malwadi Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)