Who Will Next CM Of Maharashtra | दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री पदाची धुरा फडणवीस सांभाळणार असल्याचे शहांकडून स्पष्ट संकेत; मग नाव जाहीर होण्यास दिरंगाई का?
मुंबई : Who Will Next CM Of Maharashtra | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र त्यानंतर आठवडा उलटून गेला तरी सत्तास्थापन होऊ शकलेले नाही. महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत घोडं अडल्यानेच सत्तास्थापन लांबणीवर पडल्याचे बोलले जातेय. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबरोबर दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा सूर पाहायला मिळाला.
दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झालं आहे. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत शहा यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. मात्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा त्यांची भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच केली जाणार आहे.
अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, असे पंतप्रधानांचे व माझेही मत आहे, असे स्पष्ट केले आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट संकेतही दिले. फडणवीस यांचे नाव आताच जाहीर केले तर सध्या जी अनावश्यक चर्चा सुरू आहे तिला पूर्णविराम मिळेल, असे मत मित्रपक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने झालेल्या बैठकीत व्यक्त केले.
त्यावर भाजपमध्ये (BJP) अशी पद्धत नाही. आधी आमचे दोन निरीक्षक मुंबईला जातील.
भाजप आमदारांच्या बैठकीत नेता निवड होईल.
अशी बैठक न घेता परस्पर पक्षनेतृत्वाने नाव जाहीर करण्याची पद्धत आमच्याकडे नाही.
आणि आम्ही तसे केले तर मग इतर राज्यांत पुढे नेता निवडताना महाराष्ट्राचा दाखला दिला जाईल आणि
परस्पर नाव जाहीर करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, असे शहा यांनी म्हंटल्याची माहिती आहे. (Who Will Next CM Of Maharashtra)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी