Yashwant Sinha News Political Party | भाजपच्या बड्या नेत्याकडून नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत; ‘अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या नावाने असणार पक्ष

atal bihari mhanun

मुंबई : Yashwant Sinha News Political Party | पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या देशभरात ठिकठिकाणी सभा होऊनही भाजपला अपेक्षित असे यश गाठता आले नाही. त्यामुळे याबाबत पक्षात अनेक अर्थाने चर्चा सुरु आहेत. काही महिन्यांवर झारखंडच्या निवडणूका असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राज्यातील समीकरणं बदलली आहेत तर दुसरीकडे भाजपच्या एका बड्या नेत्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत देत भाजपचे टेन्शन वाढवले आहे.

भाजपाचे एकेकाळचे वरिष्ठ नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची तयारी करत आहेत. तसेच यशवंत सिन्हा हे त्यांचा स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापन करण्याचा निर्णय हा हजारीबार येथे झालेल्या अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. हजारीबाग येथे अटल विचार मंचची बैठक नुकतीच झाली. प्राध्यापक सुरेंद्र सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र आणि वित्त मंत्रालय सांभाळणारे यशवंत सिन्हा हेही उपस्थित होते.

अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये झारखंडमधील सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा प्रस्ताव संमत करण्यात आला. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या या पक्षाचे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नावावर असेल.

यशवंत सिन्हा म्हणाले की, आजचे राजकारण हे चाटुकारितेचं राजकारण बनलं आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर वाटचाल करून स्वच्छ चारित्र्याचं राजकारण करून समाजातील प्रत्येक वर्गाचा उत्कर्ष करता येऊ शकतो.
त्यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता आहे. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना कधी होणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

सिन्हा यांनी जनता दल पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.
त्यानंतर ते भाजपात आले. नंतर ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये होते.
२०२२ मध्ये त्यांनी विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed