Shirur Pune Crime News | दोन वर्षापासुन फरार असलेला दरोड्यातील आरोपी जेरबंद ! शिरूर पोलीसांची कामगिरी

शिक्रापूर (सचिन धुमाळ) – Shirur Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलातील (Pune Rural Police) शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील (Shirur Police Station) रेकॉर्ड वरील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास शिरूर पोलिसांना यश आले आहे. प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In Robbery Case)
https://www.instagram.com/p/DAYH5WVJzI7
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस हद्दीतील रेकॉर्डवरील पाहीजे फरारी असलेल्या आरोपीताबाबत पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम घेण्याबाबत आदेशीत दिले होते त्या अनुशंगाने शिरूर पोलीस पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी महंमद आलम अब्रार सिद्धिकी, वय ३२ वर्ष, धंदा कोंबड्या विक्री व्यवसाय, रा. लोकसेवा समिती, इंदिरानगर, आर एस मार्ग मालाड ईस्ट, मुंबई ९७ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांचा कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आरोपी व त्यांचे इतर ७ साथीदारांनी दरोडा टाकला होता , यावेळी दरोडयामध्ये मिळालेल्या कोंबडयांपैकी १२४० कोंबडया के जी एल बॉयलर्स शॉप नं ७, शिरढोण, पनवेल रायगड यांना विक्री करून सदर विकीतुन आलेली ४,१८,३६० रू या रकमेपैकी २,८८,०००/- रू आरोपी यांनी वाटुन घेतले होते. हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे रा. करंजेनगर शिकापुर ता. शिरूर जि.पुणे हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना त्याला शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीचे आधारे शिकापुर परीसरातुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/DAYFjSai4rX
ही कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पो. हवा. परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, नितेश थोरात, सचिन भोई, रघुनाथ हळणोर, यांच्या पोलीस पथकाने केली आहे.
https://www.instagram.com/p/DAYB2g4C2Ef
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’