Bhosari Pune Crime News | पुणे : औषध घेऊन घरी जाणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण; हातावर दगड मारल्याने बोट फ्रॅक्चर

Bhosari Pune Crime News | Pune: Young man waylaid and brutally beaten while returning home with medicine; finger fractured after being struck on the hand with a stone.

पुणे / पिंपरी: Bhosari Pune Crime News | औषध घेऊन घरी जाणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना एमआयडीसी भोसरी परिसरात घडली. आरोपीने तरुणाच्या हातावर दगड मारल्याने त्याच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना रविवारी 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हमदिया मशिदीजवळ घडली.

या प्रकरणी पोलिसांनी बालाजीनगर, भोसरी येथे राहणाऱ्या हेमराज जीतबहादूर ठाकूर Hemraj Jitbahadur Thakur (वय 19) याला ताब्यात घेतले आहे.

अभिषेक मारुती कुऱ्हाडे (वय 22, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हाताच्या पंजावर जोरात दगड मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताचे एक बोट फ्रॅक्चर झाले.

या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.

You may have missed