Mahavikas Aghadi Agitation In Pune For Metro | ‘मेट्रो सुरू होईपर्यंत आम्ही इथून हटणार नाही’, मविआच्या नेत्यांचे पुण्यात आंदोलन (Video)
पुणे: Mahavikas Aghadi Agitation In Pune For Metro | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते मेट्रोच्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण (Pune District Court To Swargate Metro), तर स्वारगेट ते कात्रज (Swargate To Katraj Metro) या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार होते. मात्र मागील दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडल्याने सभेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.
https://www.instagram.com/p/DAaTd4opUq-
तसेच हवामान विभागा मार्फत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला होता. या दौऱ्यात करोडो रुपयांचा चुराडा झाल्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी म्हंटले.
https://www.instagram.com/p/DAX6p0bJLYo
मात्र आता याच प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे. मात्र अगोदरच मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला असून मोदी हे लोकार्पण करण्यास विलंब करत आहेत.
https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P
या पार्श्वभूमीवर शहरातील मविआच्या नेत्यांनी आक्रमक होत शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय
येथील मेट्रो स्थानक येथे आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), माजी आमदार मोहन जोशी (Congress Mohan Joshi), ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) शहर अध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI
आज मेट्रो सुरू झाल्या शिवाय आम्ही या ठिकाणापासून हटणार नाही, अशी भूमिका शहरातील मविआच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’