Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

CM Eknath Shinde

मुंबई : Eknath Shinde To Shivsainik | विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) नेते मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथ शिंदेच असावेत अशी अपेक्षा करीत आहेत तर सर्वाधिक जागेचा दाखला देत भाजप नेते मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाचा उल्लेख करताना दिसत आहेत. याबाबत माध्यमांसमोर तशा भूमिकाही नेते मांडताना दिसत आहेत.

दरम्यान काही नेत्यांनी शिवसैनिकांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्यामुळे असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातून परिस्थिती चिघळू नये, यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले असून कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत शिंदे म्हणाले, ” महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे.

मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो.
पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये.
समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील”,
असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed