Wagholi Pune Accident News | वाघोली : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर अपघात; टेम्पोच्या धडकेत 38 वर्षीय महिलेचा मृत्यू
पुणे : Wagholi Pune Accident News | पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात टेम्पोने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
गीता रवींद्र चव्हाण (वय 38, रा. कोलते पार्क, कावडे वस्ती, वाघोली) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता आणि त्यांचा 18 वर्षीय मुलगा समर्थ हे 23 सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अहिल्यानगर रस्त्याने दुचाकीवरून जात होते. वाघोली परिसरात एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात गीता गंभीर जखमी झाल्या, तर समर्थ दुचाकीवरून फेकला गेल्याने तोही गंभीर जखमी झाला. गीता यांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक महेश गळगटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
