Kondhwa Pune Crime News | कोंढवा : अल्पवयीन मुलीशी विवाह करुन पैशांसाठी दिले घरातून हाकलून; मुलीच्या आईवडिलांसह पती, सासुवर गुन्हा दाखल

पुणे : Kondhwa Pune Crime News | मुलगी १५ वर्षाची असताना तिचा बालविवाह लावून दिला. लग्नानंतर तिला मुलगा झाला. आता माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी या महिलेला घरातून हाकलून देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Child Marriage Act)
याबाबत एका १९ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फिर्यादीचे पती (वय २१), सासु (वय ४५), फिर्यादीची आई (वय ३५), वडिल (वय ४२) यांच्यावर पोस्को व बालविवाह अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे आणि सातारा येथे १० मार्च २०२१ ते २२ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या १५ वर्षांच्या असताना त्यांच्या आई वडिलांनी बेकायदा त्यांचा विवाह लावून दिला. लग्नानंतर पतीने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध ठेवल्याने त्या गरोदर राहून एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर फिर्यादीचे पतीने फळविक्रीसाठी दुकान घ्यायचे आहे, त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. पैसे घेऊन न आल्यास नांदविण्यासाठी नकार दिला. तेव्हा फिर्यादीचे आईने आतापर्यंत फिर्यादीच्या पतीला थोडे थोडे करुन १ लाख १० हजार रुपये दिले. असे असतानाही त्याने फिर्यादीस मारहाण करुन राहते घरातून हाकलून दिले असून फिर्यादीचा संभाळ करण्यास नकार दिला आहे. कोंढवा पोलिसांनी पोक्सो, बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत. (Kondhwa Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी