Yerawada Pune Crime News | पुणे : दहशत माजविणार्या गुंडांसाठी पोलिसांचा ‘नवा पॅटर्न’; तात्पुरत्या तपास मदत केंद्रात गुंडांचा ‘साम्रसंगीतात ‘सत्कार’

पुणे : Yerawada Pune Crime News | येरवडा तुरुंगातून (Yerawada Jail) सुटल्यानंतर प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे (Prafulla Alias Guddaya Ganesh Kasbe) याची समर्थकांनी रॅली काढली होती. लक्ष्मीनगर भागात (Laxmi Nagar Yerawada) त्याने आपले शक्ती प्रदर्शन केले होते. या गुंडाच्या समर्थकांपैकी ९ जणांना अटक करुन पोलिसांनी तात्पुरते तपास मदत केंद्रात त्यांचे साम्रसंगीत स्वागत करण्यात आले. दहशत माजविणार्या गुंडांच्या टोळक्यांची दहशत संपविण्यासाठी पोलिसांनी (Yerawada Police) हा नवा पॅटर्न आणला आहे.
https://www.instagram.com/reel/DEo0flYpfHN/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
ज्या ज्या भागात गुन्हेगार आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न करतील, त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे तात्पुरते तपास मदत केंद्र उभे करुन त्यात या सत्कारमूर्तींचा आगळा वेगळा सत्कार करणार आहे. हे केवळ लक्ष्मीनगर पुरते नव्हते तर सर्व ठिकाणी जेथे गुंड आपली दहशत परविण्याचा प्रयत्न करतील, तेथे तेथे अशाच प्रकारे लोकांना निर्भय वाटावे यासाठी उपक्रम राबविला जाणार आहे, असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांनी सांगितले.
रॅली काढून दहशत निर्माण करणार्या कसबेसह त्याच्या ४० समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर २४ तासाच्या आत त्याच्या ९ समर्थकांना पोलिसांनी अटक केली. त्यांचा लायकीप्रमाणे सन्मान करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मीनगर येथील राज चौकात तात्पुरते तपास मदत केंद्र उभारले. तेथे पोलिसांनी त्यांची काही खास गाणी वाजवत भाईच्या समर्थकांना त्या गाण्यांवर ठेका धरायला लावला. मानपानाचा कार्यक्रम संपवून या सर्व सत्कारमूर्तीना बुरखा घालून राज चौकापासून मच्छी मार्केट, भीम ज्योत चौक, लक्ष्मीनगर तसेच परिसरात पायी फिरवण्यात आले. (Yerawada Pune Crime News)
या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे,
सहायक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील तसेच गुन्हे शाखा व येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात