Baba Siddique Murder Case | बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर, डायरीत 7 बिल्डरांसह एका भाजप नेत्याचं नाव असल्यानं खळबळ

Baba Siddique

मुंबई : Baba Siddique Murder Case | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता मुंबईतील 7 बिल्डरांसह भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचे नाव समोर आले आहे. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान यांनीच आपल्या जबाबात ही माहिती पोलिसांना दिल्याचे समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. Tv 9 मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांना डायरी लिहिण्याची सवय होती. त्यांच्या हत्येच्या काही तास आधी त्यांनी डायरीत भाजपा नेते मोहित कंबोज यांचे नाव लिहिले होते. तसेच सिद्दिकी यांचे मोहित कंबोज यांच्याशी व्हॉट्सअपवरून बोलणेही झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी खूनप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर ही माहिती समोर आली. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याने आपल्या जबाबात वरील माहिती पोलिसांना दिली होती.

झिशान सिद्दिकींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हे नियमित डायरी लिहित असत. वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी ते नागरिकांच्या बाजूने उभे रहात असत. हे काम करताना काही मोठ्या बिल्डर्संसोबत त्यांचा वाद झाला होता. या बिल्डर्सची नावे त्यांनी डायरीत नोंदवली आहेत. बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहीद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स अशी ती नावे आहेत.

हत्येच्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहिले होते, ते नाव भाजपा नेते मोहित कंबोज यांचे आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांचे मोहित कंबोज यांच्यासोबत व्हाट्सअपवर संभाषण झाले होते. संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये बोलणे झाले होते. पण, मोहित कंबोज यांचे नाव का लिहिले, हे मी सांगू शकत नाही, असेही झिशान यांनी पोलिसांना सांगितले आहे.

झिशान सिद्दिकींच्या या माहितीनंतर पोलिसांनी तपास केला. परंतु, काहीही आढळले नाही. यानंतर बाबा सिद्दिकी हत्येत लॉरेन्स बिष्णोई गँगवर आरोप ठेवण्यात आला. विशेष म्हणजे शिवसेनेचे अनिल परब यांची भेट घेतल्याचा उल्लेख बाबा सिद्दिकी यांनी आपल्या डायरीत केला आहे.

या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी म्हटले की, बाबा सिद्दिकी यांच्याशी माझे चांगले संबंध होते. आमच्यात मैत्री होती. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करत होतो. त्यांच्या हत्येमुळे मला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या कुटुंबासोबत मी देखील रुग्णालयात होतो. या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर यायला पाहिजे, असे कंबोज यांनी म्हटले आहे. (Baba Siddique Murder Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed