Indapur Crime News | ‘आता तुझा मर्डर करणारच’, मुलीच्या प्रेमसंबधातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राडा, दोघेजण मंदिरात बसले असताना पाच जणांकडून कोयत्याने सपासप वार

Immoral Relationship-Murder

इंदापूर : Indapur Crime News | मंदिरात गप्पा मारत बसलेल्या दोन विद्यार्थ्यांवर पाच जणांनी कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना भवानीनगर येथे घडली आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की दोन्ही विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत पडले. हल्ला झालेले तरुण आणि हल्ला करणारे तरुण सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.३१) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास संचित घोळवे आणि सुजल जाधव आणि त्यांचे काही सहकारी मित्र भवानीनगर येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये बसले होते. त्यावेळी अदनान शेख, पियुष चव्हाण, यशराज अरवडे आणि दोन अल्पवयीन मित्र असे पाच जण मंदिरात आले. त्यांनी सुजल जाधव आणि संचित घोळवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर पाचही आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्याने सुजल जाधव आणि संचित घोळवे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर मुलांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धमक्या देण्यात आल्या. दोन्ही गटांनी एकमेकांना फोन करून ‘आता तुझा मर्डर करणारच’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. हल्ल्यानंतर पाचही आरोपी पुण्याच्या दिशेने पळून जात होते. मात्र वालचंदनगर पोलिसांनी तातडीने दोन वेगवेगळी पथके तयार करत पुण्याच्या दिशेने रवाना केली. पाचही आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली.

एका मुलीच्या प्रेमसंबधातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवार (दि.३०) प्रेम प्रकरणावरून जखमी विद्यार्थी आणि हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. हा वाद विद्यार्थ्यांनी आपसात मिटवला होता. मात्र शुक्रवारी (दि.३१) पुन्हा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुजल जाधव याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. (Indapur Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed