Arijit Singh Live Concert In Pune | अरिजित सिंगच्या गायकीची जादू अनुभवण्याची पुणेकरांना संधी, म्हाळुंगे येथील MCA च्या स्टेडियमवर लाईव्ह कॉन्सर्ट

Arijit Singh

पुणे : Arijit Singh Live Concert In Pune | सुरांचा बादशहा असलेल्या अरिजित सिंगच्या गायकीची जादू अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट 16 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाळुंगे येथील एमसीएच्या स्टेडियमवर मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठीची तिकिटे insider.in या वेबसाईटवर बुक करता येणार आहेत. अवघ्या 5999 रुपयांपासून ही तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामुळे कॉन्सर्टला प्रेक्षकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी पार्किंगची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली आहे. तब्बल 50 हजारांहून अधिक संगीतप्रेमी आणि अरिजित सिंगचे चाहते एमसीएच्या स्टेडियमवर संगीताचा आस्वाद घेण्यासाठी जमा होणार आहेत.

अरिजित सिंगची जवळपास सगळीच गाणी ही अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ‘अपना बना ले’, ‘तुम क्या मिले’, ‘केसरिया’ किंवा तुमचे कोणतेही आवडते गाणे ऐकण्याची ही नामी संधी आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हेरंब शेळके (Heramb Shelke) ग्रुपने केले आहे. कार्यक्रमाचे सहप्रायोजक ‘तुबोर्ग’ असणार आहेत. तर हा कार्यक्रम ‘टु बीएचके’ने श्रोत्यांसाठी आणला आहे. (Arijit Singh Live Concert In Pune)

Ticket link: https://insider.in/arijit-singh-live-in-pune-2025-mar16-2025/event

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed