Pune Crime News | कायदेशीर कामे करुन देण्याचे आश्वासन देऊन महिलेला 13 लाखांचा गंडा घालणार्‍या तिघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  कायदेशीर सल्लागार असल्याचे खोटे सांगून कामे करुन देण्याचे आश्वासन देऊन महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एन आय बी एम रोडवर राहणार्‍या एका ५३ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंकित दिलीप लोडिया (वय ३५), पर्ल अंकित लोडिया (वय ३२), डॅरेल मथायस (वय ६०, सर्व रा. धरम विश्वभर सोसायटी, मुलुंड वेस्ट, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२५ दरम्यान कोंढव्यात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना आपण कायदेशीर सल्लागार असल्याचे खोटे सांगून वेगवेगळ्या न्यायाधीशांचे फोटो दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. घटस्फोटाची केस तसेच त्यांचे फ्लॅटचा प्रापॅर्टी टॅक्स, बॅक डेटेड गिफ्ट डिड, फिर्यादी यांच्या वडिलांचे शेअर डिमटेरिअलायझेशन याची सर्व कामे करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच फिर्यादी यांच्या मित्रांचे कोणतेही काम न करता व पैसे परत न करता त्यांची १३ लाख ५ हजार ६८० रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

You may have missed