Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन कर्ज काढायला लावुन प्रेमी झाला पसार
पुणे : Pune Crime News | तरुणीशी मैत्री करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला फायनान्सकडून कर्ज काढायला लावून त्याचे हप्ते न भरताच प्रेमी पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनप्रित सिंग कॅथ ऊर्फ करण Manpreet Singh Kath alias Karan (वय ३५, रा. सप्तर्षी टॉवर, जनकल्याण नगर रोड, मालाड वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनप्रितसिंग याने फिर्यादी यांच्याशी मैत्री करुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध केले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांना तू तुझ्या नावाने फायनान्सकडून कर्ज घेऊन मला दे, मी कर्जाचे हप्ते भरतो, असे सांगून त्यांना विविध फायनान्स अॅपवरुन एकूण २ लाख ७० हजार ५०० रुपयांचे कर्ज काढायला लावून ते स्वत:च्या वापरासाठी घेतले. या कर्जाचे हप्ते भरले नाही. फिर्यादी यांचा ७५ हजार रुपयांचा मोबाईल दोन तासासाठी पाहिजे, असे सांगून त्यांच्याकडून घेऊन तो पळून गेला. मनप्रित सिंग याच्याशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाडेकर तपास करीत आहेत.
