Pune PMC News | बांधकामाचा राडारोडा नदी पात्रात टाकणाऱ्या आकांक्षा डेव्हलपर्सला 10 लाखाचा दंड आणि बांधकामही थांबवले

Pune PMC News

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्याविरोधात यापुढे कडक कारवाई; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा

पुणे : Pune PMC News | शनिवार पेठेत नदी पात्रालगत राडारोडा टाकणाऱ्यावर महापालिकेने कडक कारवाई केली. हा राडारोडा शिवाजीनगर तोफखान्यात सुरू असलेल्या आकांक्षा डेव्हलपरच्या एस आर ए साईट वरून आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने विकासकावर गुन्हा दाखल करून काम थांबवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. यापुढे सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर अशीच कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.

आयुक्त नवल किशोर राम म्हणाले,

मुळा मुठा पात्रात राडारोडा टाकला जातो हे बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. रात्रीच्या वेळी हे प्रकार सुरू होते. एवढ्या लोकांच्या उपस्थितीत होत असल्याने अधिकच आव्हानात्मक होते. परंतु काही लोक बदलायला तयार नाही.

यापुढील काळात असे कृत्य करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेणार. कुठेही राडारोडा टाकला तर मुळाशी जावून संबंधित सर्व घटकांवर कारवाई करणार.

शनिवार पेठेत नदी पात्रालगत राडारोडा टाकला गेल्याचे निदर्शन आले. फायनल प्लॉट ८२२, जुना तोफखाना येथे विकासक निहाल शेख यांच्या आकांक्षा डेव्हलपर यांच्याकडून टाकला जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्याचे तत्काळ काम थांबवायची प्रक्रिया सुरू केली. विकासकावर १० लाख रुपये दंड केला आहे. फौजदारी गुन्हा दाखल करण्यासोबत त्याची बांधकामाची जागा सील केली आहे. यापुढे प्रत्येक केस मध्ये अशीच कारवाई करणार आहोत.



शांतीवन परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकून नदीत सपाटीकरण केले आहे. आकांक्षा डेव्हलपर हे एसआरए चे काम करत आहेत. घनकचरा विभागाने त्याला नोटीस दिली आहे. साधारण २० ट्रक माल आहे.

अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, आम्ही सी एन डी वेस्ट पॉलीसी तयार केली आहे. यामध्ये बांधकाम परवानगी दिल्यानंतर बांधकाम प्लिंथ पर्यंत आल्यावर विकासकाकडून सी एन डी वेस्ट कुठे टाकले याचे स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. महापालिकेचा वाघोली येथे बांधकाम रडारोड्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे. राडारोडा तिथेच टाकणं बंधनकारक आहे. बांधकाम व्यावसायिकांना या प्लांट मध्ये राडारोडा टाकल्याची एन ओ सी या प्लांटवरून घ्यावी लागणार आहे. यानंतरच प्लिंथ कंपलिशन दिले जाणार आहे.

बांधकाम निरीक्षकांनी त्यांच्या भागातील बांधकामावरील राडारोडा कुठे टाकला गेला याची माहिती ठेवणे. त्या व्यावसायिकाने सार्वजनिक ठिकाणी असा राडारोडा टाकला तर तेथील निरीक्षकाने थेट पोलिस तक्रार करून पुढील कारवाई शेवटपर्यंत न्यावी असे आदेश या एस ओ पी मध्ये दिली. लवकरच या नियमावली नुसार कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती कौर यांनी दिली.

You may have missed