Pune Crime News | ‘‘भावेश मोरे आमचा भाई, त्याच्याशी वाकड घालतो’’; टोळक्याने तरुणावर हत्याराने वार करुन केले गंभीर जखमी, बिबवेवाडी पोलिसांनी सहा जणांवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  भावेश मोरे हा आमचा भाई आहे, त्याच्याशी तू वाद का  घालतो, असे म्हणून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

साक्षर महेश अडागळे (वय २५, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. साक्षर अडागळे याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अथर्व ऊर्फ साई शिंदे Atharva alias Sai Shinde (वय २०) आणि राहुल ख्याडगी (वय १९, रा़ शिवतेजनगर, अपर बिबवेवाडी) यांना अटक केली आहे़ त्यांचे साथीदार मोहन जीवन विद्यासागर Mohan Jeevan Vidyasagar (तिघे रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी) केदार ऊर्फ सोन्या क्षीरसागर Kedar alias Sonya Kshirsagar (रा. ओमकारनगर, बिबवेवाडी, ओमकार राहुल अडागळे Omkar Rahul Adagale (रा. विघ्नहर नगर, अप्पर बिबवेवाडी, समर्थ गरड (र. मांगडेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बिबवेवाडीतील समर्थनगर येथे २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दीड वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर अडागळे हा बी कॉमच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहे. साक्षर अडागळे याचा मित्र शंतून गायकवाड हा समर्थनगर येथे राहत असून त्याचे साई शिंदे (रा. शिवतेजनगर, अप्पर बिबवेवाडी) याच्याबरोबर जुने वाद आहेत. साक्षर अडागळे हा रात्री दीड वाजेपर्यंत शंतून गायकवाड याच्या घरासमोर गप्पा मारत थांबले होते. शंतून घरी निघून गेला. साक्षर अडागळे हा गाडी काढून घरी जाण्याच्या तयारी असताना पाठीमागून साई शिंदे व त्याचे साथीदार आले. त्याने साक्षर याला शिवीगाळ करुन ‘‘भावेश मोरे आमचा भाई आहे. भावेश मोरेशी तू वाद का घालतो. त्याचेशी तू वाकड का बोलतो,’’ असे म्हणून मारहाण करु लागला. साई शिंदे याने त्याच्याकडील हत्याराने साक्षर याच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. त्याच्या साथीदारांनीही मारहाण सुरु केली. त्याचा आवाज ऐकून शंतून गायकवाड याची आई साक्षर याला सोडविण्यासाठी मध्ये आली असता साई शिंदे व त्याच्या साथीदारांनी त्यांना देखील शिवीगाळ करुन मध्ये आला तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. साक्षर याच्या डोक्यातून खुप रक्त येऊ लागल्यावर तो गाडी सोडून बाजूला राहणारा मित्र राहुल याच्या घरी पळत गेला. त्यानंतर ते टोळके निघून गेले. साक्षर अडागळे याचे भारती हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केले़ डॉक्टरांनी डोक्याला गंभीर जखम असल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख तपास करत आहेत.

You may have missed