Lingayat Vadhu Var Palak Meeting | पुणे येथे उद्या राज्यस्तरीय लिंगायत वधु वर पालक मीटिंग
पुणे : Lingayat Vadhu Var Palak Meeting | महात्मा बसवेश्वर वधू वर सुचक केंद्र कुपवाड सांगली व जागतिक लिंगायत महासभा पुणे याच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पुणे येथील वेदशास्त्रो तेजक सभा ,1046 सदाशिव पेठ , सारसबागेजवळ हॉटेल कल्पना विश्व चौक , पुणे-30 सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत धर्मातील सर्व पोटजाती चा उदा . लिंगायत पंचम , शिलवंत , दिक्षावंत , वाणी , माळी , कोष्टी , तेली , कुंभार , गवळी , इत्यादी वधु वर पालक मिटीग आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे यांनी सांगितले.
लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु वर पालक मिटींग उदघाटन मा शरण मल्लिकार्जुन मुलगे ( जागतिक लिंगायत महासभा – राज्य उपाध्यक्ष )व मा शरण चंद्रकांत हुरकुडे ( जागतिक लिंगायत महासभा – स्टेट सेक्रेटरी )महात्मा , मा शरणी नंदिनी पाटील – जेष्ठ पत्रकार पुणे यांच्या शुभहस्ते व मा शरण बसवराज कणजे – जागतिक लिगायत महासभा स्टेट जनरल सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे
प्रमुख पाहुणे – मा शरण संगमेश्वर सरकाळे
जागतिक लिगायत महासभा पुणे जिल्हा उपाध्यक्ष
मा शरणी सरला चिमगावे
जागतिक लिंगायत महासभा महिला आघाडी पुणे तसेच मा शरण महेश विजय बुटाले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय लिंगायत वधु वर पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत, वाणी, माळी, कुंभार,तेली, गवळी , जंगम, शिलवंत, दिक्षावंत, कोष्टी,पंचम,कोष्टी आदीसह सर्व पोटजातीतील वधु वर पालक उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे , मा शरण संतोष मल्लशेटटी बसवसेवा प्रतिष्ठान पुणे , मा शरण सिद्धरामेश नावदगेरे – बसववादी सोशल फौडेशन – अध्यक्ष , मा शरण चंद्रकांत खोचरे – जागतिक लिगायत महासभा , मेंबर, पुणे कमिटी कार्यवाहक प्रियांका शेगावे, या मेळाव्याचे नियोजन करीत आहेत. नोंद वधुवर यांना प्रत्यक्ष हजर असणाऱ्या वधुवर यांना वधुवर माहिती पुस्तिका 2025 चे मान्यवरांचे हस्ते भेट देण्यात येणार आहे
राज्यातील लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधु वर पालकांनी दि.29 मार्च रोजी सकाळी 11वाजता पुणे येथील वेदशास्त्रो तेजक सभा , 1046 सदाशिव पेठ , सारस बागेजवळ हॉटेल कल्पना विश्व चौक , पुणे – 30 या सभागृहात उपस्थित रहाण्याचे आवाहन महात्मा बसवेश्वर वधू वर सुचक केंद्राचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगाव यांनी केले आहे.
