Pune Crime News | रामनवमीच्या मिरवणुकीत महिलांमध्ये नाचू नका, सांगितल्याने तरुणावर मारहाण करुन केले जखमी; बी टी कवडे रोडवरील घटना
पुणे : Pune Crime News | रामनवमीच्या मिरवणुकीत बॅनर लावण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला होता. याच वेळी मिरवणुकीत महिलांमध्ये नाचू नका, असे सांगितल्याचा राग धरुन जखमी झालेल्या तरुणाने व त्याच्या मित्राने एकाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
याबाबत नंदु नवनाथ थोरात (वय २९, रा. प्रकाशा कॉम्प्लेक्स, देवकी पॅलेस चौक, बी टी कवडे रोड, घोरपडी) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित परदेशी (वय २४, रा. देवकी पॅलेस चौक, बी टी कवडे रोड, घोरपडी), विनायक म्हेत्रे (वय २८), अक्षय आनंद गवळी Akshay Anand Gawli (वय ३०, रा. कात्रज) व त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी Ajinkya Anand Gawli (वय २७, रा. शक्तीनगर, बी टी कवडे रोड, घोरपडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बी टी कवडे रोडवरील आय सी आय सी आय बँकेसमोर २६ मार्च रोजी रात्री पावणेअकरा वाजता घडली होती.
अखंड हिंदू संघाच्या वतीने बी टी कवडे रोडवर रामनवमीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत काशीराम मोघे याने बॅनर लावल्यावर त्यांच्यात वाद झाला होता. त्यावरुन काशीराम मोघे, नंदु थोरात व त्याच्या साथीदारांनी अक्षय गवळी याच्यावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले होते.
नंदु थोरात याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय गवळी व त्याचे साथीदार अमित परदेशी, विनायक म्हेत्रे हे महिलांमध्ये नाचत होते. त्यामुळे नंदु थोरात याने महिलांमध्ये नाचू नका,असे म्हणाला होता. त्याचा राग मनात धरुन त्यांनी दगडाने नंदु थोरात याच्या डाव्या कानाशिलावर व पाठीत मारुन तसेच पंजावर मारुन जखमी केले. पोलीस हवालदार माने तपास करीत आहेत़
