Pune Crime News | पार्सल देण्यासाठी येऊन विनयभंग करणार्या डिलिव्हरी बॉयला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | पार्सल देण्यासाठी आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चतुं:श्रृंगी पोलिसांनी या डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.
सागर रोहीदास वाझे Sagar Rohidas Vaze (वय ३०, रा. हरीष शितोळे चाळ, प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या बाबत एका २१ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी आणि २७ मार्च २०२६ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हिने जिओ मार्ट मधूून काही सामान मागविले होते. त्याची डिलिव्हरी देताना सागर वाझे याने या तरुणीची लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मिशो अॅपवरुन तिने काही वस्तू मागविल्या होत्या. त्याची डिलिव्हरी देण्यासाठी हाच तरुण आला. त्याने पुन्हा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी सागर वाझे याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
