Pune Crime News | मोबाईल क्रमांक न दिल्याने पीएमपी वाहकाने बस प्रवासात खांद्याला, पाठीला जाणीवपूर्वक स्पर्श करुन युवतीचा केला विनयभंग; सहकारनगर पोलिसांनी पीएमपी वाहकाला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पीएमपी बसमधून प्रवास करत असताना बस वाहकाने युवतीला मोबाईल क्रमांक घेण्याचा प्रयत्न केला. तिने देण्यास नकार दिल्यावर तिला जाणीवपूर्वक खांद्याला व पाठीला स्पर्श करुन विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी या पीएमपी बसवाहकाला अटक केली आहे.

आरीफ जलील शेख Arif Jalil Shaikh (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या वाहकाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरीफ शेख याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रज बस डेपो ते डी मार्ट या सातारा रोडवरील बस प्रवासात २८ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरीफ शेख हा पीएमपीच्या वाघोली डेपोमध्ये वाहक म्हणून कामाला आहे. फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी कात्रज बस डेपो त डी मार्ट या बसमधून सातारा रोडने प्रवास करीत होती. या प्रवासाच्या दरम्यान आरीफ शेख याने या युवतीला तिचा मोबाईल क्रमांक मागितला. तिने मोबाईल क्रमांक देण्यास असमर्थता दर्शविली़ त्याच्या रागातून त्याने या युवतीला वाईट उद्देशाने खांद्याला तसेच पाठीला जाणीवपूर्वक स्पर्श करुन विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

You may have missed