Pune Crime News | व्यावसायिक स्पर्धेतून हॉटेल चालकासह दोघांवर महर्षीनगरमध्ये वार; हल्ल्यात हाताचे मनगट तुटून झाले वेगळे, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Pune Crime News | A gang beat up a young man saying, "Is this your father's road?"; The young man's nose was fractured after being stoned.

पुणे : Pune Crime News | अमृततुल्य मध्ये वडा पाव सेंटर सुरु केल्याने रस्त्यावरील हातगाडीचा धंदा कमी झाल्याच्या रागातून तिघांनी हॉटेल चालकासह दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात एकाचे मनगट तुटून वेगळे झाले. हल्ल्यानंतर २४ तास उलटून गेल्यानंतरही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

किशोर राजू बनसोडे (वय २९), प्रसाद राजेंद्र आजुरे (वय २८, दोघे रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. हल्लेखोरांनी प्रसाद आजुरे याच्या हातावर वार केल्याने त्याचे मनगट तुटले होते. शस्त्रक्रिया करुन ते जोडण्यात आल्याचे समजते.

याबाबत सुनील राजू बनसोडे (वय २६) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोम्मीराजा मुथ्थुराज थेवर Pommiraja Muththuraja Thevar (वय २४, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) व त्याचा भाऊ वन्नी थेवर व आणखी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे यांचे महर्षीनगर परिसरात व्यंकटेश्वरा अमृततुल्य हॉटेल आहे. आरोपी थेवर हा बनसाडे यांच्या हॉटेलसमोर दाक्षिणात्य खाद्यपदार्थ विक्री ची गाडी लावायचा. बनसोडे यांनी अमृततुल्यबरोबर व्यंकटेश्वरा वडेवाले हे शेजारीच हॉटेल सुरु केले. बनसोडे यांच्या वडापावच्या हॉटेलमुळे थेवर याच्या हातगाडीवरील धंदा कमी झाला. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. थेवर याने यापूर्वी बनसोडे हे हॉटेलमध्ये घरगुती गॅस वापरत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्या हॉटेलची तपासणी करण्यात आली होती. हे समजल्यावर बनसोडे यांनी आमच्या हॉटेलसमोर हातगाडी लावू नका, असे सांगितले होते.

या कारणावरुन थेवर आणि बनसोडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास किशोर बनसोडे आणि प्रसाद आजुरे उपाहारृहात होते. आरोपी थेवर आणि त्याच्याबरोबर तीन साथीदार तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे, तसेच दांडके होते. वादातून आरोपींनी बनसोडे आणि आजुरे यांच्यावर शस्त्राने वार करण्यास सुुरुवात केली. प्रसाद यांनी वार हातावर झेलला. त्यात त्याचे मनगट तुटले. दोघे जण गंभीर जखमी झाले. भरदिवसा दोघांवर हल्ला झाल्यानंतर महर्षीनगर परिसरात घबराट उडाली. बनसोडे आणि आजुरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वारगेट पोलीस थेवर बंधु व त्यांच्या साथीदारांचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करीत आहेत.

You may have missed