Hinjewadi Pune Crime News | अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडून हिंजवडी पोलिसांनी 27 लाखांचा MD केला जप्त; वाकड, गोवंडीत केली कारवाई

Hinjewadi Pune Crime News | Hinjewadi police arrested two people who came for selling drugs and seized MD worth Rs 27 lakhs; Action taken in Wakad, Govandi

पुणे : Hinjewadi Pune Crime News |  वाकड येथे एम डी विक्रीसाठी आलेल्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४२ ग्रॅम एम डी जप्त केला. अधिक चौकशीत त्याचा साथीदाराला मुंबईतील गोवंडी येथून पकडून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा २०० ग्रॅम एम डी जप्त केला आहे.

अतुल शंकर बालगुडे Atul Shankar Balgude (वय ३५, रा. पाथरगाव, ता. मावळ) आणि शाहरुख ऊर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी Shahrukh Alias Saddam Iqbal Ansari (रा. गोवंडी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे आपल्या सहकार्‍यांसह पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सहायक पोलीस फौजदार नरेश बलसाने यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक जण वाकडमधील विनोदे वस्ती येथे एम डी विक्रीसाठी येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI PI Balaji Pandhare) यांना बातमी कळवून पोलीस पथकाने विनोदे वस्ती येथे सापळा लावला. बातमी प्रमाणे चारचाकीतून आलेल्या अतुल बालगुडे याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपयांचा ४२ ग्रॅम एम डी तसेच ३ लाख २४ हजार २०० रुपयांची चारचाकी व इतर माल जप्त केला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा अंमली पदार्थ शाहरुख अन्सारी याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी गोवंडीतील शाहरुख अन्सारी याला पकडून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा २०० ग्रॅम एम डी जप्त केला. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी एकूण २७ लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार नरेश बलसाने, चिंतामणी जोशी, कैलास केंगले, संदीप मासाळ, विजय गेंगजे, प्रशांत गिलबिले, कबीर पिंजारी, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अरुण पारधी यांनी केली आहे.

You may have missed