Pune Rain News | पुण्यात एप्रिल महिन्यातील आजवरच्या इतिहासातील विक्रमी पाऊस ! 4 एप्रिल 1896 रोजी झाला होता 51 मिमी पाऊस, आज शिवाजीनगर 65, खडकवासला 107 मिमी पावसाची झाली नोंद
पुणे : Pune Rain News | पुणे शहर आणि जिल्ह्यात आज दुपारी तुफान झालेला अवकाळी पाऊस हा ऐतिहासिक ठरला आहे. पुणे हवामान विभागाच्या गेल्या १५० वर्षातील रेकॉर्डनुसार आज झालेला पाऊस हा एप्रिल महिन्यातील विक्रमी पाऊस ठरला आहे.
पुण्यात यापूर्वी सर्वकालिन विक्रम ४ एप्रिल १८९६ रोजी एका दिवसात ५१.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या दशकभराचा विचार करता १३ एप्रिल २०२३ रोजी एकाच दिवसात २४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावेळी पाषाण येथे १३ एप्रिल २०२३ रोजी सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी २००५ मध्ये ३६.७ मिमी आणि २०११ मध्ये २५.६ मिमी पाऊस झाला होता.
आज दुपारपासून शहराच्या सर्वच भागात अतिजोरदार पाऊस झाला. शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेक दुकानांमध्ये, घरामध्ये पाणी शिरले होते. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा पाऊस
खडकवासला येथे १०७ मिमी
एनडीए येथे ८४ मिमी,
आंबेगाव कात्रज – ८६,
गरवारे, डेक्कन – ८४
वारजे – ८०,
शिवाजीनगर – ६५,
पाषाण – ३६
हडपसर ४२
चिंचवड २८
