Baramati and Rahuri By Election | बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसची उडी; उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात

Baramati byelection 2026 | Sunetra Pawar's phone call also proved fruitless! Congress's 'claw' moved in Baramati; This condition was imposed to withdraw candidacy

पुणे : Baramati and Rahuri By Election | बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपली कंबर कसली असून, दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

बारामतीची जागा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे, तर राहुरीची जागा भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती पूर्ण केल्या आहेत. मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर येत्या २४ तासांत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल असून, २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. सुरुवातीला या निवडणुका बिनविरोध होण्याच्या चर्चा होत्या, मात्र आता काँग्रेसने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे बारामती आणि राहुरीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विरोधी पक्षांच्या हालचालींकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीत या चुरशीच्या लढतीचा निकाल स्पष्ट होईल.

You may have missed