Pune Crime News | नर्‍हे येथील लॉजवर वेश्या व्यवसाय करवुन घेणार्‍या तिघांना अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने केली अटक, 4 तरुणींची केली सुटका

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  नर्‍हे येथील स्वर्ग एक्झिकेटिव्ह पॅराडाईज लॉज येथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याच्या माहितीवरुन अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने येथे छापा टाकून तिघांना अटक केली. तेथील ४ तरुणींची सुटका केली आहे.

अभिषेक दिलीप गवळी Abhishek Dilip Gawli (वय २४, रा. खेड शिवापूर), रामु सांडु देवकर Ramu Sandu Devkar (वय २४, रा. सिंहगड), महेश गणेश नागने Mahesh Ganesh Nagne (वय ३४, रा. नर्‍हे गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष यांना नर्‍हे येथील स्वर्ग एक्झिकेटिव्ह पॅराडाईज लॉज येथे महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे समजले. याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी बनावट ग्राहक येथे पाठविला. या ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. त्यात ४ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्‍या तिघांना पकडले. नर्‍हे पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कावाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमय रसाळ, किशोर भुजबळ, रेश्मा कंक, वैशाली इंगळे यांनी केली आहे.

You may have missed