Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; आजचे ताजे दर काय? जाणून घ्या

Gold

पुणे :  Gold-Silver Price Today | आज सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी जागतिक राजकारणातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कडक इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, भारतीय वायदा बाजारात (MCX) सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली.  

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा जून वायदा आज सुमारे ०.९१ टक्क्यांनी घसरून १,४८,३०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. किरकोळ बाजारातही याचे पडसाद उमटले असून, मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,९३० रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास पोहोचला आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी पडझड पाहायला मिळत आहे. चांदीचा मे वायदा १.१८ टक्क्यांनी घसरून २,२९,७५० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. जागतिक बाजारात चांदीची किंमत ७१.८८ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आली आहे.

या दरवाढीमागील मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची वाढलेली ताकद आणि ट्रम्प यांनी इराणला दिलेला मंगळवार रात्री ८ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम. या युद्धसदृश वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री (Liquidation) होत असल्याने किमतीवर दबाव येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जोपर्यंत अमेरिका आणि इराणमधील हा तणाव कमी होत नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात अशीच अनिश्चितता आणि चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

You may have missed